शरद पवारांनी चमकून विचारलं, 'मी'? मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर केलं सूचक भाष्य!
शरद पवारांच्या सूचक विधानांमुळे त्यांच्या पक्षातील हालचाली आणि मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना नवीन दिशा मिळाल्याचे दिसत आहे.
शरद पवार सध्या सांगली दौऱ्यावर आहेत, जिथे त्यांनी स्थानिक राजकीय नेते आणि आजी-माजी आमदारांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असल्याची चर्चा यावेळी रंगली. पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवारांनी या चर्चांवर सूचक भाष्य केलं.

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येणार?
पत्रकारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याबाबत विचारले असता, शरद पवार म्हणाले, “हर्षवर्धन पाटील यांनी कधी राजीनामा दिलाय? आज दुपारी २ वाजेपर्यंत काय होतंय ते बघू.” यावरून पाटील यांच्या इनकमिंगच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
राजेंद्र देशमुखांच्या घोषणेवर आश्चर्य
राजेंद्र देशमुख यांच्या भाजपातून शरद पवार गटात येण्याच्या घोषणेवर शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केले. पवारांनी म्हणाले, “हे सगळे जुने सहकारी भलतीकडे गेले असतील. त्यांच्या लक्षात आलं की हा रस्ता काही खरा नाही. आपल्या योग्य रस्त्याने गेलं पाहिजे.”
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर सूचक भाष्य
पत्रकारांनी पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांबद्दल विचारले असता, त्यांनी चमकून विचारले, "मी?" आणि मिश्किल हास्य करत उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट नकार न दिल्यामुळे यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
शरद पवारांच्या या सूचक विधानांमुळे त्यांच्या पक्षातील हालचाली आणि मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना नवीन दिशा मिळाल्याचे दिसत आहे.